मुंबईत नोकरीची मोठी संधी; राज्य शासना कडून २० ठिकाणी ‘रोजगार महाकुंभ’, १०वी ते पदव्युत्तर उमेदवारांना थेट रोजगाराची संधी

राज्य शासनातर्फे मुंबई शहर व उपनगरांमध्ये २० प्रमुख ठिकाणी भव्य 'रोजगार महाकुंभ' मेळाव्याचे आयोजन. १०वी ते पदव्युत्तर तरुणांना थेट रोजगाराची संधी.

मुंबई: राज्यातील बेरोजगार तरुण-तरुणींना हक्काच्या आणि थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने मंगळवारी संपूर्ण मुंबई शहर व उपनगरांमध्ये एकाच दिवशी भव्य 'रोजगार महाकुंभ' मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील विविध २० प्रमुख शैक्षणिक, तांत्रिक व व्यावसायिक केंद्रांवर हा मेळावा पार पडणार असून, यामध्ये देशातील व राज्यातील नामवंत खासगी कंपन्या, कॉर्पोरेट संस्था आणि उद्योग क्षेत्रातील दिग्गज उद्योजक सहभागी होणार आहेत. नोकरीच्या शोधात असलेल्या आणि आपल्या करिअरची उत्तम सुरुवात करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची आणि सुवर्णसंधी ठरणार आहे.

         या महामेळाव्यात बँकिंग, रिटेल, माहिती तंत्रज्ञान (IT), मॅन्युफॅक्चरिंग आणि आधुनिक सेवा क्षेत्रातील अग्रेसर कंपन्यांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे उमेदवारांना कोणत्याही मध्यस्थाविना थेट कंपन्यांच्या वरिष्ठ प्रतिनिधींशी संवाद साधून आपल्या योग्यते नुसार आणि कौशल्या नुसार नोकरी मिळवण्याचा मार्ग सुकर होणार आहे. या रोजगार महाकुंभासाठी १०वी, १२वी, पदवीधर, पदव्युत्तर, आयटीआय (ITI), डिप्लोमा तसेच विविध व्यावसायिक कौशल्यप्राप्त (Skill Holders) तरुण-तरुणी पात्र असणार आहेत. मुंबईतील चर्चगेट, फोर्ट, कफ परेड, माटुंगा, दादर, सायन, वडाळा, भायखळा, माहिम आणि महालक्ष्मी यांसारख्या प्रमुख परिसरांतील नामांकित महाविद्यालयांमध्ये व कौशल्य विकास संस्थांमध्ये या मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

         या उपक्रमांतर्गत चर्चगेट येथील एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, फोर्टमधील प्रतिष्ठित रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, सिडनहॅम वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, जय हिंद महाविद्यालय, सिद्धार्थ वाणिज्य महाविद्यालय आणि कफ परेड येथील जागतिक व्यापार केंद्र (MVIRDC) येथे प्रमुख केंद्रे असणार आहेत. याशिवाय, माहिमची सेंट झेवियर्स तांत्रिक संस्था, दादरची तांत्रिक अभियांत्रिकी शाळा व डी.जी. रुपारेल महाविद्यालय, भायखळचे एम.एच. साबू सिद्दिक तंत्रनिकेतन, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील आतिथ्य व्यवस्थापन संस्था, तसेच माटुंगा येथील रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालय व गुरु नानक खालसा महाविद्यालय येथेही नोकरीचे दालन खुले असणार आहे. तसेच, सायनचे मणीबेन शाह महिला महाविद्यालय व गुरु नानक कला-विज्ञान महाविद्यालय, वडाळ्याचे एस.आय.डब्ल्यू.एस. महाविद्यालय, डेव्हलर्न तंत्रज्ञान प्रायव्हेट लिमिटेड (दादर), भवन एच. सोमाणी महाविद्यालय आणि महालक्ष्मी येथील लाला लजपतराय वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय यांसारख्या अग्रगण्य शैक्षणिक संस्थांमध्येही रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत.

           इच्छुक व पात्र उमेदवारांनी या व्यापक रोजगार महाकुंभाचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी तातडीने अधिकृत लिंकवर जाऊन आपली पूर्वनोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कंपन्या सोबत थेट मुलाखतीची संधी साधून आपल्या व्यावसायिक कौशल्याला न्याय देण्याची ही उत्तम वेळ असून, जास्तीत जास्त तरुणांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

 

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

अवकाशात स्पेसएक्सचा नवा विक्रम; ‘स्टारशिप’ पहिल्यांदाच कक्षेत, २६ स्टारलिंक उपग्रह यशस्वी

Latest News

अवकाशात स्पेसएक्सचा नवा विक्रम; ‘स्टारशिप’ पहिल्यांदाच कक्षेत, २६ स्टारलिंक उपग्रह यशस्वी अवकाशात स्पेसएक्सचा नवा विक्रम; ‘स्टारशिप’ पहिल्यांदाच कक्षेत, २६ स्टारलिंक उपग्रह यशस्वी
इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सने स्टारशिपच्या १४व्या चाचणीत इतिहास रचत यान पहिल्यांदाच पृथ्वीच्या कक्षेत पोहोचवले व २६ स्टारलिंक उपग्रह यशस्वीरीत्या सोडले....
महाराष्ट्रातील दुष्काळावर केंद्राचे लक्ष; शिवराजसिंह चौहान वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्याच्या दौऱ्यावर येणार
दिवाळीच्या रेल्वे तिकिटांसाठी प्रवाशांची धावपळ; बुकिंग सुरू होताच तिकिटे फुल्ल,वेटिंग’चा मनस्ताप
एनडीए सोबत जाण्याच्या चर्चांना शरद पवारांचा स्पष्ट नकार; यायचं असेल तर आमच्यासोबत या
हुंड्याच्या छळाचा आरोप अन् वैष्णवीचा दुर्दैवी अंत; नवविवाहित आयटी अभियंतेच्या मृत्यूने पुण्यात खळबळ

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software