अनाथ, दिव्यांग मुलींच्या हस्ते राज्यपालांना राखी; लोकभवनात रक्षाबंधन उत्साहात

लोकभवनात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत रक्षाबंधन सोहळा. 'ममता बाल सदन', NAB च्या मुली व आदिवासी महिलांनी बांधली ईको-फ्रेंडली राखी.

मुंबई: समाजाच्या विविध स्तरांतून आणि खडतर परिस्थितीवर मात करत उल्लेखनीय योगदान देत असलेल्या महिला व मुलींच्या उपस्थितीत यंदाचा रक्षाबंधनाचा सण अतिशय उत्साहात आणि वेगळ्याच आनंदात साजरा करण्यात आला. मुंबईतील लोकभवनात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्याशी संवाद साधत अनाथ मुली, दिव्यांग भगिनी, स्वच्छता कर्मचारी, आशा सेविका आणि आदिवासी महिलांनी त्यांना राखी बांधली. या पवित्र प्रसंगी राज्यपालांनी सर्व भगिनींना रक्षाबंधना निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा देत प्रेमळ भेटवस्तू दिल्या. रक्षाबंधन हा समाजातील सर्व घटकांना एका धाग्यात बांधणारा आणि परस्पर आदर निर्माण करणारा पवित्र सण असल्याची भावना यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी व्यक्त केली.

     या विशेष कार्यक्रमात विविध संस्था आणि घटकांच्या प्रतिनिधींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. दिवंगत सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनी पुरंदर (पुणे) येथे अनाथ व गोरगरीब मुला-मुलींसाठी स्थापन केलेल्या ‘ममता बाल सदन’ या संस्थेतील अनाथ मुलींनी लोकभवनात येऊन राज्यपालांना राखी बांधली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दीपक गायकवाड आणि संपर्क अधिकारी मुकेश चौधरी उपस्थित होते. तसेच, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात अहोरात्र सेवा बजावणाऱ्या महिला कर्मचारी, तसेच आरोग्य विभागात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आशा सेविका व आरोग्य स्वयंसेविकांनीही राज्यपालांच्या हातात राखी बांधून रक्षणाचा व स्नेहाचा संदेश दिला.

       या सोहळ्याचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे पालघर जिल्ह्यातील ‘सेवा विवेक’ ग्राम विकास केंद्राच्या वतीने बांबू उत्पादनांच्या माध्यमातून स्वयंरोजगार करीत असलेल्या आदिवासी महिलांनी तयार केलेली पूर्णपणे पर्यावरणपूरक (Eco-friendly) राखी राज्यपालांना बांधली. या आदिवासी महिलांच्या स्वावलंबनाला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम उपस्थितांचे आकर्षण ठरला, ज्यामध्ये संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लुकेश बंड उपस्थित होते. याशिवाय, ब्रह्माकुमारी संस्थेच्या नेपियन सी केंद्राच्या प्रमुख ब्रह्माकुमारी रुक्मिणी यांच्यासह ब्रह्माकुमारी बंधू-भगिनींनी उपस्थित राहून राज्यपालांना राखी बांधली व आध्यात्मिक संदेश दिला. आर्य समाज माटुंगा येथील शालेय विद्यार्थिनींनीही या आनंदात सहभाग घेतला.

       या सोहळ्यात ‘नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड’ (NAB) या दृष्टिहीन व्यक्तींच्या शिक्षण, रोजगार व पुनर्वसनासाठी झटणाऱ्या संस्थेतील विशेष मुलींनी देखील राज्यपालांना राखी बांधत आपल्या कौशल्याची व आत्मविश्वासाची अनुभूती दिली. याप्रसंगी संस्थेच्या कार्यकारी संचालिका पल्लवी कदम या देखील आवर्जून उपस्थित होत्या. समाजाच्या विविध घटकांतील महिला व मुलींना एकत्र आणून राज्यपाल महोदयांनी साजरा केलेला हा रक्षाबंधनाचा सोहळा सर्वसमावेशकतेचे उत्तम उदाहरण ठरला असून, या कार्यक्रमामुळे लोकभवनातील वातावरण अतिशय भारलेले आणि आनंदाचे पाहायला मिळाले.

 

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

हाफकिन कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता; आश्वासित प्रगती योजनेला गती

Latest News

हाफकिन कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता; आश्वासित प्रगती योजनेला गती हाफकिन कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता; आश्वासित प्रगती योजनेला गती
हाफकिन महामंडळ कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत विधान भवनात बैठक. उपसभापती सचिन अहिर व मंत्री नरहरी झिरवाळ यांचे...
चाकण-भोसरी औद्योगिक पट्ट्याची नवी झेप; २,३२० कोटींच्या गुंतवणुकीने विकासाला वेग
नेपाळच्या पुरात भारतीय पर्यटक संपर्कविहीन; महाराष्ट्र सरकारकडून विशेष हेल्पलाईन सुरु
अनाथ, दिव्यांग मुलींच्या हस्ते राज्यपालांना राखी; लोकभवनात रक्षाबंधन उत्साहात
महिला सक्षमीकरणाला सर्वोच्च प्राधान्य; ‘उमेद’ अभियानातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software