मुळीकवस्तीच्या ७०० एकर शेतीचा प्रश्न ऐरणीवर; उपसा सिंचन योजना थांबवण्याची मागणी

दहिवडीतील मुळीकवस्ती येथे ७०० एकर शेतीला पाण्यापासून वंचित ठेवल्याचा आरोप. शेखर गोरे यांनी चेंबर मंजूर होईपर्यंत उपसा सिंचन योजनेचे काम थांबवण्याचे दिले निर्देश.

दहिवडी: दहिवडी परिसरातील बहुचर्चित 'गुरुवर्य कै. लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेच्या' कामात स्थानिक शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्याया वरून राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. मुळीकवस्ती परिसरातील सुमारे ७०० एकर शेतीला सिंचनाचा लाभ मिळण्या पासून जाणीव पूर्वक वंचित ठेवले जात असल्याच्या शेतकरी तक्रारीची गंभीर दखल घेत, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी थेट घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. जोपर्यंत मुळीकवस्तीतील ७०० एकर शेती ओलिताखाली आणण्यासाठी आवश्यक असलेल्या चेंबरचे काम प्रत्यक्षात मंजूर होऊन सुरू होत नाही, तोपर्यंत या उपसा सिंचन योजनेचे पुढील सर्व काम ताबडतोब बंद ठेवण्याचे सक्त आदेश त्यांनी संबंधित अधिकारी व कंत्राट दारांना दिले आहेत.

         मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, दहिवडी अंतर्गत येणाऱ्या मुळीकवस्ती येथील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीला सिंचनाचे पाणी मिळावे यासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. मात्र, स्थानिक नेत्यांचा दबाव आणि प्रशासकीय मनमानी कारभारामुळे या भागाला डावलले जात असल्याची संतप्त भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती. या अन्याया विरोधात परिसरातील शेतकरी, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी एकत्र येत शेखर गोरे यांच्याकडे कैफियत मांडली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शेखर गोरे यांनी तातडीने मुळीकवस्ती गाठली आणि प्रत्यक्ष सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. या पाहणी दरम्यान लाभ क्षेत्रातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       घटना स्थळावरील वस्तुस्थिती समजून घेतल्यानंतर शेखर गोरे यांनी तीव्र आक्रमक भूमिका घेत जलसंपदा विभागाचे अधिकारी व कंत्राटदारांना खडसावले. "जोपर्यंत मुळीकवस्तीतील ७०० एकर शेतीला पाणी मिळण्याचा मार्ग सुकर करणारे चेंबर मंजूर होत नाही आणि त्याचे काम प्रत्यक्ष सुरू होत नाही, तोपर्यंत या उपसा सिंचन योजनेचे एकही पुढचे काम चालू दिले जाणार नाही," असा कडक व स्पष्ट इशारा त्यांनी दिला. शेखर गोरे यांनी घेतलेल्या या ठाम आणि शेतकऱ्यांच्या बाजूच्या भूमिके मुळे स्थानिक ग्रामस्थांमधून मोठे समाधान व्यक्त केले जात आहे. या दणक्यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल, अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

हाफकिन कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता; आश्वासित प्रगती योजनेला गती

Latest News

हाफकिन कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता; आश्वासित प्रगती योजनेला गती हाफकिन कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता; आश्वासित प्रगती योजनेला गती
हाफकिन महामंडळ कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत विधान भवनात बैठक. उपसभापती सचिन अहिर व मंत्री नरहरी झिरवाळ यांचे...
चाकण-भोसरी औद्योगिक पट्ट्याची नवी झेप; २,३२० कोटींच्या गुंतवणुकीने विकासाला वेग
नेपाळच्या पुरात भारतीय पर्यटक संपर्कविहीन; महाराष्ट्र सरकारकडून विशेष हेल्पलाईन सुरु
अनाथ, दिव्यांग मुलींच्या हस्ते राज्यपालांना राखी; लोकभवनात रक्षाबंधन उत्साहात
महिला सक्षमीकरणाला सर्वोच्च प्राधान्य; ‘उमेद’ अभियानातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software