पाणीपुरी खाण्याच्या बहाण्याने सोनसाखळी चोरी; कोथरूड मध्ये ज्येष्ठ महिलेची फसवणूक

पुण्याच्या कोथरूड भागात ६३ वर्षीय महिला पाणीपुरी विक्रेत्याची २.४७ लाखांची सोनसाखळी चोरट्याने हिसकावली. कोथरूड पोलिसांत गुन्हा दाखल.

पुणे : कोथरूड परिसरात पाणीपुरीचा व्यवसाय करणाऱ्या ६३ वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील तब्बल २ लाख ४७ हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरट्याने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. पाणीपुरी खाण्याच्या बहाण्याने गाडीजवळ आलेल्या चोरट्याने महिलेची नजर चुकवून सोनसाखळी हिसकावून घेतली आणि घटना स्थळावरून पसार झाला. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, ६३ वर्षीय महिला कोथरूड मधील गुरू गणेशनगर परिसरात राहतात. त्या डुक्करखिंड परिसरातील दोडके प्लाझा इमारती समोरील मोकळ्या जागेत पाणीपुरीची गाडी लावून व्यवसाय करतात. सोमवारी, २४ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास त्या नेहमीप्रमाणे व्यवसाय करत होत्या.

       यावेळी एक तरुण पाणीपुरी खाण्याच्या बहाण्याने त्यांच्या गाडीजवळ आला. त्याने पाणीपुरीची मागणी केली. महिला ग्राहकाला पाणीपुरी देण्यात व्यस्त असल्याची संधी साधून या तरुणाने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून घेतली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे महिला घाबरल्या. त्यांनी आरडाओरडा करून मदतीसाठी प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत चोरट्याने गर्दी आणि अंधाराचा फायदा घेत तेथून पळ काढला.

     या घटनेनंतर महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा नोंदवला असून, त्याचा शोध सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रण तपासण्यात येत असून, त्याआधारे चोरट्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत.

    या घटनेमुळे कोथरूड परिसरात खळबळ उडाली असून, रस्त्याच्या कडेला छोटे व्यवसाय करून उदर निर्वाह करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

हाफकिन कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता; आश्वासित प्रगती योजनेला गती

Latest News

हाफकिन कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता; आश्वासित प्रगती योजनेला गती हाफकिन कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता; आश्वासित प्रगती योजनेला गती
हाफकिन महामंडळ कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत विधान भवनात बैठक. उपसभापती सचिन अहिर व मंत्री नरहरी झिरवाळ यांचे...
चाकण-भोसरी औद्योगिक पट्ट्याची नवी झेप; २,३२० कोटींच्या गुंतवणुकीने विकासाला वेग
नेपाळच्या पुरात भारतीय पर्यटक संपर्कविहीन; महाराष्ट्र सरकारकडून विशेष हेल्पलाईन सुरु
अनाथ, दिव्यांग मुलींच्या हस्ते राज्यपालांना राखी; लोकभवनात रक्षाबंधन उत्साहात
महिला सक्षमीकरणाला सर्वोच्च प्राधान्य; ‘उमेद’ अभियानातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software