नेपाळच्या पुरात भारतीय पर्यटक संपर्कविहीन; महाराष्ट्र सरकारकडून विशेष हेल्पलाईन सुरु

नेपाळमधील भोटेकोशी नदीच्या पुरात १३३ भारतीयांसह ४०३ पर्यटक अडकले. महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी राज्य सरकारने १०७० व ९३२१५८७१४३ हेल्पलाइन सुरू केली.

काठमांडू: नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटेकोशी नदीला आलेल्या विनाशकारी आणि अचानक आलेल्या महापुरामुळे मोठा अनर्थ ओढवला असून, या नैसर्गिक आपत्तीत शेकडो परदेशी आणि भारतीय पर्यटक संपर्कविहीन झाल्याची अत्यंत चिंताजनक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत महाराष्ट्रातील नागरिकांचाही समावेश असल्याची शक्यता वर्तवली जात असून, नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या आणि संपर्काबाहेर असलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी महाराष्ट्र शासनाने तातडीने पावले उचलत विशेष आपत्कालीन यंत्रणा आणि हेल्पलाईन क्रमांक सुरू केले आहेत. प्रशासनाकडून युद्धपातळीवर माहिती संकलनाचे कार्य सुरू असून, अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी हालचाली तीव्र करण्यात आल्या आहेत.

      नेपाळ पर्यटन मंडळाने जारी केलेल्या ताज्या अधिकृत आकडेवारीनुसार, बुधवारी दुपारी अचानक आलेल्या या भीषण पुरामुळे विविध देशांतील एकूण ४०३ पर्यटक संपर्कविहीन झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक तब्बल १३३ भारतीय नागरिकांचा समावेश असून, त्यांच्या सुरक्षिततेबद्दल कुटुंबीयांमध्ये कमालीची भीती व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय पर्यटकांवतिरिक्त ६२ नेपाळी, ४७ अमेरिकन, ३४ ऑस्ट्रेलियन, ३३ ब्रिटिश आणि २४ कॅनेडियन नागरिकांसह मलेशिया, युक्रेन, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, जपान, जर्मनी, फ्रान्स, इस्रायल, पोर्तुगाल यांसारख्या १९ हून अधिक देशांचे पर्यटक या संकटात सापडले आहेत. अनेक प्रवाशांचा संपर्क पूर्णपणे तुटल्यामुळे बेपत्ता किंवा संपर्कात नसलेल्यांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

        या आपत्कालीन परिस्थितीत महाराष्ट्रातून नेपाळमध्ये गेलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने तातडीने यंत्रणा सज्ज केली आहे. मंत्रालयातील राज्य नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवण्यात आला असून, अडकलेल्या नागरिकांची नेमकी माहिती गोळा करण्यासाठी एक विशेष ऑनलाईन लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रशासनाशी संपर्क साधण्यासाठी टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक १०७० तसेच +९१-९३२१५८७१४३ हा अतिरिक्त संपर्क क्रमांक जारी करण्यात आला आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या किंवा संपर्कात नसलेल्या नागरिकांच्या नातेवाइकांनी व परिचितांनी तातडीने या क्रमांकावर संपर्क साधून संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळ मधील सध्याचे ठिकाण अथवा हॉटेलचे नाव, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबाचा संपर्क क्रमांक प्रशासनाला द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. केंद्र सरकार, परराष्ट्र मंत्रालय आणि नेपाळ मधील यंत्रणांच्या समन्वयाने संपर्क विहीन नागरिकांचा शोध घेऊन त्यांना सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी राज्य सरकारकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

डिजिटल अरेस्ट सारख्या सायबर फसवणुकीपासून सावध राहा; फसवणूक झाल्यास तात्काळ '१९३०' वर संपर्क साधा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Latest News

डिजिटल अरेस्ट सारख्या सायबर फसवणुकीपासून सावध राहा; फसवणूक झाल्यास तात्काळ '१९३०' वर संपर्क साधा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डिजिटल अरेस्ट सारख्या सायबर फसवणुकीपासून सावध राहा; फसवणूक झाल्यास तात्काळ '१९३०' वर संपर्क साधा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सायबर फसवणूक रोखण्यासाठी 'डिजिटल अरेस्ट' लघुपट व '१९३० सायबर अँथम'चे अनावरण. फसवणूक झाल्यास 'गोल्डन आवर'मध्ये १९३० वर संपर्क साधण्याचे मुख्यमंत्री...
हाफकिन कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता; आश्वासित प्रगती योजनेला गती
चाकण-भोसरी औद्योगिक पट्ट्याची नवी झेप; २,३२० कोटींच्या गुंतवणुकीने विकासाला वेग
नेपाळच्या पुरात भारतीय पर्यटक संपर्कविहीन; महाराष्ट्र सरकारकडून विशेष हेल्पलाईन सुरु
अनाथ, दिव्यांग मुलींच्या हस्ते राज्यपालांना राखी; लोकभवनात रक्षाबंधन उत्साहात

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software