पुण्यात डीजेमुक्त गणेशोत्सवाला २०० हून अधिक मंडळांचा पाठिंबा

पुण्यातील २०० हून अधिक गणेश मंडळांचा यंदाचा गणेशोत्सव 'डीजे-मुक्त' साजरा करण्याचा निर्णय. पुनीत बालन यांची माहिती; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांचा कारवाईचा इशारा.

पुणे: दहीहंडी आणि आगामी गणेशोत्सवात मोठ्या आवाजाच्या साऊंड सिस्टीम व डीजेच्या वापरावर सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पुण्यातून एक अत्यंत स्वागतार्ह आणि संस्कृती जोपणारी बातमी समोर आली आहे. पुण्यातील तब्बल २०० हून अधिक प्रमुख गणेश मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव पूर्णपणे ‘डीजे-मुक्त’ पद्धतीने साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्टचे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी पत्रकार परिषदेत या बाबतची अधिकृत घोषणा केली असून, या उपक्रमामुळे पुण्याच्या गणेशोत्सवाची पारंपरिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख कायम राखण्यास मोठी मदत होणार आहे.

       माध्यमांशी बोलताना पुनीत बालन यांनी स्पष्ट केले की, पुण्याच्या गणेशोत्सवाचे अस्सल स्वरूप टिकवून ठेवणे आणि मोठ्या आवाजा मुळे सर्वसामान्य नागरिकांना, विद्यार्थ्यांना, वृद्धांना व रुग्णांना होणारा त्रास टाळणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. गेल्या काही वर्षांपासून या संकल्पनेला पुण्यातून उत्तम प्रतिसाद मिळत असून, यंदा २०० हून अधिक गणेश मंडळे या सकारात्मक चळवळीत उत्साहाने सहभागी झाली आहेत. धार्मिक परंपरांचे पावित्र्य राखून आणि सामाजिक भान ठेवून उत्सव कसा साजरा करावा, याचे उत्तम उदाहरण या मंडळांनी घालून दिले आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस प्रशासनानेही आपली भूमिका अत्यंत कठोर केली असून, ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्याचे संकेत दिले आहेत. पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले आहे की, सार्वजनिक उत्सव साजरा करण्यास आणि नागरिकांना आनंद व्यक्त करण्यास पोलिसांचा कोणताही विरोध नाही; मात्र कायदेशीर मर्यादेचे उल्लंघन करून उच्चांकी आवाजात ध्वनिप्रदूषण निर्माण करणाऱ्या साऊंड सिस्टीम आणि डीजेला कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या यंत्रणा ताडीने जप्त केल्या जातील, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

        आगामी गणेशोत्सवाच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी नुकतीच पुणे महानगरपालिकेत विविध विभागांचे अधिकारी, पोलीस प्रशासन आणि शहर भरातील गणेश मंडळांच्या प्रतिनिधींची महत्त्वाची समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत ध्वनि प्रदूषण नियंत्रणाचे नियम, सुरक्षित वाहतूक व्यवस्थापन, अग्निसुरक्षा आणि नागरिकांची गैरसोय रोखण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांवर सखोल चर्चा करण्यात आली. पुनीत बालन यांनी यापूर्वीही डीजे मुक्त आणि शिस्तबद्ध गणेशोत्सवाचा आग्रह धरत पुढाकार घेतला होता. या मोहिमेचा विस्तार आता इतर सणांमध्येही होताना दिसत असून, डीजेऐवजी पारंपरिक ढोल-ताशा पथके, पारंपरिक वाद्यवृंद, बँड आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना तरुण वर्गाकडूनही पसंती दिली जात आहे. यंदा मोठ्या प्रमाणावर गणेश मंडळे या डीजेमुक्त अभियानात जोडली गेल्यामुळे पुण्याच्या गणेशोत्सवात सांस्कृतिक समृद्धी, शिस्त आणि ध्वनि प्रदूषण नियंत्रण यांचा उत्तम समतोल पाहायला मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

हाफकिन कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता; आश्वासित प्रगती योजनेला गती

Latest News

हाफकिन कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता; आश्वासित प्रगती योजनेला गती हाफकिन कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता; आश्वासित प्रगती योजनेला गती
हाफकिन महामंडळ कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत विधान भवनात बैठक. उपसभापती सचिन अहिर व मंत्री नरहरी झिरवाळ यांचे...
चाकण-भोसरी औद्योगिक पट्ट्याची नवी झेप; २,३२० कोटींच्या गुंतवणुकीने विकासाला वेग
नेपाळच्या पुरात भारतीय पर्यटक संपर्कविहीन; महाराष्ट्र सरकारकडून विशेष हेल्पलाईन सुरु
अनाथ, दिव्यांग मुलींच्या हस्ते राज्यपालांना राखी; लोकभवनात रक्षाबंधन उत्साहात
महिला सक्षमीकरणाला सर्वोच्च प्राधान्य; ‘उमेद’ अभियानातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software