सचिन वाझेला जामीन, पण अटी कायम; ५ जिल्ह्यांत प्रवेशबंदीमुळे पुण्यात राहणार

'अँटिलिया' स्फोटके प्रकरणातील आरोपी सचिन वाझे यांना विशेष सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला असून ५ जिल्ह्यांत बंदी असल्याने त्यांचा मुक्काम पुण्यात असणार आहे.

मुंबई :देशाचे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बहुचर्चित ‘अँटिलिया’ घराबाहेर स्फोटके ठेवण्याच्या प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली होती. या गुन्ह्यात मागील साडेपाच वर्षांहून अधिक काळ कारागृहात असलेले माजी व बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना विशेष सत्र न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे वाझे यांच्या तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला असला, तरी त्यांच्या भोवती कठोर अटींचा ससेमिरा कायम आहे. मुंबईसह लगतच्या पाच जिल्ह्यांमध्ये त्यांना प्रवेशास सक्त प्रतिबंध करण्यात आल्यामुळे त्यांचा आगामी मुक्काम पुण्यात असण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, या जामीनाला कडाडून विरोध करत राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) उच्च न्यायालयात धाव घेतली असून, आज यावर अत्यंत महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे.

         विशेष सत्र न्यायालयाने सचिन वाझे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेत काही कडक अटी आणि शर्तींच्या अधीन राहून त्यांना दंडात्मक व वैयक्तिक हमीपत्रावर जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाच्या आदेशा नुसार, सचिन वाझे यांना मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या पाच महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये राहण्यास अथवा प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. केवळ न्यायालयाच्या अधिकृत सुनावणीसाठी हजर राहावे लागल्यासच त्यांना या भागात प्रवेश करण्याची मुभा असेल, अन्यथा त्यांना या भौगोलिक सीमांच्या बाहेरच राहावे लागेल. याशिवाय, न्यायालयाच्या निर्देशा नुसार १ लाखांचा वैयक्तिक बॉन्ड आणि एक स्थानिक जामीदार देण्याची अट घालण्यात आली आहे. तसेच, जर पासपोर्ट उपलब्ध असेल तर तो तातडीने एनआयएकडे जमा करावा लागेल आणि जामीन आदेशानंतर अवघ्या सात दिवसांच्या आत मुंबई बाहेर वास्तव्यास असणाऱ्या नवीन पत्त्याची माहिती प्रशासनाला द्यावी लागेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

         या संपूर्ण सुनावणी दरम्यान न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवताना स्पष्ट केले की, सध्याच्या पुराव्यांवरून यूएपीए (UAPA) कायद्यांतर्गत दहशतवादी कृत्य केल्याचे प्राथमिक दृष्ट्या निष्पन्न होत नाही. असे असले तरी, न्यायालयाने हेदेखील स्पष्ट केले आहे की जामीन मंजूर होणे म्हणजे आरोपीची पूर्णपणे निर्दोष मुक्तता झालेली नाही, खटल्याच्या पुढील टप्प्यात पुराव्यांची अंतिम तपासणी होणारच आहे. या कायदेशीर प्रक्रियेनंतर सचिन वाझे यांची आज सुटका होणे अपेक्षित असून, अटींनुसार त्यांना थेट पुण्याकडे रवाना व्हावे लागणार आहे.

         दुसरीकडे, सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी तपास यंत्रणा असणाऱ्या 'एनआयए'ने या निर्णया विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत जामीनाला तीव्र विरोध दर्शवला आहे. आज या याचिकेवर महत्त्वाची सुनावणी होणार असून, सर्वोच्च न्यायालय यावर नेमका काय निर्णय देणार आणि सचिन वाझे यांच्या सुटकेचा मार्ग कायम राहणार का, याकडे संपूर्ण राजकीय व कायदेशीर वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! रब्बी पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभरा, मोहरीसह ६ पिकांना वाढीव हमीभाव

Latest News

शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! रब्बी पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभरा, मोहरीसह ६ पिकांना वाढीव हमीभाव शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! रब्बी पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभरा, मोहरीसह ६ पिकांना वाढीव हमीभाव
केंद्र सरकारने २०२७-२८ च्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मोहरी, मसूरसह ६ पिकांच्या हमीभावात (MSP) वाढ जाहीर केली आहे.
महाराष्ट्र बनणार जगाचे ‘इनोव्हेशन हब’; नवी मुंबईत ३०० एकरांवर उभी राहणार इनोव्हेशन सिटी
पिंपरी-चिंचवडच्या लेकीचा आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णवेध; भारतीय महिला तिरंदाजी संघाचा चीनवर विजय
तडीपार आरोपीची पुन्हा गुन्हेगारी; वाहन चोराला पत्नीसह खडक पोलिसांनी पकडले
पुणेकरांनो सावधान! कचरा टाकणे, थुंकणे महागणार; महापालिका दंडाची रक्कम वाढवणार

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software