तडीपार आरोपीची पुन्हा गुन्हेगारी; वाहन चोराला पत्नीसह खडक पोलिसांनी पकडले

पुण्यातील भवानी पेठेतून दुचाकी चोरणाऱ्या तडीपार आरोपी वसीम पटेलला खडक पोलिसांनी पत्नीसह ताब्यात घेतले असून चोरीची अ‍ॅक्टिव्हा जप्त केली आहे.

पुणे : भवानी पेठेतील किराड आळी परिसरातून दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला खडक पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, या चोरीत त्याच्या पत्नीचाही सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. वसीम सलीम पटेल (वय ४२, रा. कोंढवा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. वसीम पटेल याच्यावर पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये यापूर्वी १४ गुन्हे दाखल आहेत. तसेच सन २०२५ मध्ये त्याला पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. याशिवाय तो एमपीडीए कायद्या नुसार स्थानबद्धतेतून सुटलेला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

       २१ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ७.५० वाजता भवानी पेठेतील किराड आळी येथून काळ्या रंगाची अ‍ॅक्टिव्हा दुचाकी चोरीला गेली. या दुचाकीची किंमत सुमारे ७० हजार रुपये होती. दुसऱ्या दिवशी तक्रारदाराने खडक पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा क्रमांक ५२३/२०२६ नोंदवून तपास सुरू केला. दुचाकी चोरीचा तपास सुरू असताना सह-पोलीस निरीक्षक विनोद शिंदे आणि पोलीस अंमलदार हेमंत पेरणे यांना आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळाली. पोलीस रेकॉर्डवरील वसीम पटेल यानेच ही चोरी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

      त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने कोंढवा येथील त्याच्या निवासस्थानी कारवाई केली. २३ सप्टेंबर रोजी वसीम पटेल याला ताब्यात घेण्यात आले.पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता, त्याने पत्नीच्या मदतीने दुचाकी चोरी केल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी चोरीला गेलेली ७० हजार रुपये किमतीची अ‍ॅक्टिव्हा दुचाकी जप्त केली आहे. या प्रकरणात पत्नीच्या भूमिकेबाबतही पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.

१४ गुन्हे दाखल; २०२५ मध्ये तडीपार

        वसीम पटेल याच्यावर पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये १४ गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. कोंढवा पोलिसांनी सन २०२५ मध्ये त्याला पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपार केले होते. तसेच एमपीडीए कायद्यानुसार त्याला स्थानबद्ध करण्यात आले होते. स्थानबद्धतेतून सुटल्यानंतर त्याने पुन्हा गुन्हेगारी कारवायांना सुरुवात केल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.

        ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले आणि सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शर्मिला सुतार, समाधान पवार, सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न ज-हाड, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे, राहुल मखरे आणि विनोद शिंदे यांच्यासह पोलीस पथकाने ही कारवाई केली.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! रब्बी पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभरा, मोहरीसह ६ पिकांना वाढीव हमीभाव

Latest News

शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! रब्बी पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभरा, मोहरीसह ६ पिकांना वाढीव हमीभाव शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! रब्बी पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभरा, मोहरीसह ६ पिकांना वाढीव हमीभाव
केंद्र सरकारने २०२७-२८ च्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मोहरी, मसूरसह ६ पिकांच्या हमीभावात (MSP) वाढ जाहीर केली आहे.
महाराष्ट्र बनणार जगाचे ‘इनोव्हेशन हब’; नवी मुंबईत ३०० एकरांवर उभी राहणार इनोव्हेशन सिटी
पिंपरी-चिंचवडच्या लेकीचा आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णवेध; भारतीय महिला तिरंदाजी संघाचा चीनवर विजय
तडीपार आरोपीची पुन्हा गुन्हेगारी; वाहन चोराला पत्नीसह खडक पोलिसांनी पकडले
पुणेकरांनो सावधान! कचरा टाकणे, थुंकणे महागणार; महापालिका दंडाची रक्कम वाढवणार

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software