पिण्याचे पाणी अन् ड्रेनेज लाईन एकाच मार्गावर? पुणेकरांच्या आरोग्याचा प्रश्न; स्वतंत्र पाइपलाइनची मागणी

पुण्यात ड्रेनेज आणि पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्या एकत्र असल्याने दूषित पाण्याचा धोका निर्माण झाला आहे. जुन्या पाईप्स बदलून नवीन HDPE लाईन्स टाकण्याची मागणी करण्यात आली आहे.

पुणे: पुणे शहरातून एक अत्यंत संतापजनक आणि नागरिकांच्या जीवाशी खेळणारी गंभीर बाब समोर आली आहे. शहरातील अनेक दाट लोकवस्तीच्या आणि झोपडपट्टी भागांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्या थेट ड्रेनेज लाईनच्या आतून किंवा अगदी जवळून नेण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. ड्रेनेज आणि पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईन्स एकाच भागात किंवा एकमेकांच्या संपर्कात असल्यामुळे पाणी दूषित होऊन हजारो नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या अत्यंत ज्वलंत आणि गंभीर प्रश्नावर तातडीने पावले उचलत, ड्रेनेजमधून जाणाऱ्या सर्व जुन्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन्स त्वरित बदलून त्या ठिकाणी स्वतंत्र आणि आधुनिक हाय-डेन्सिटी पोलिथिलीन म्हणजेच एचडीपीई (HDPE) पाईपलाईन टाकण्यात यावी, अशी आक्रमक मागणी पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक रवींद्र साळेगावकर यांनी थेट महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

          महापालिका आयुक्तांना दिलेल्या सविस्तर निवेदनात नगरसेवक रवींद्र साळेगावकर यांनी शहरातील सद्यस्थितीचा अत्यंत वास्तववादी पाढा वाचला आहे. पुण्यातील अनेक जुन्या व दाट लोकवस्तीच्या भागात मुख्य जलवाहिनी वरून अनधिकृतपणे पाणी खेचण्यासाठी किंवा अंतर्गत जलवाहिन्या टाकण्यासाठी चुकीच्या पद्धतीने तांत्रिक नियोजन केले गेले आहे. विशेषतः ड्रेनेज वाहिन्यांच्या अगदी जवळून किंवा थेट त्यामधून पिण्याच्या पाण्याच्या पाईप्स नेल्या गेल्यामुळे मोठा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या अनेक भागांत अस्तित्वात असलेल्या डी.आय. (DI) आणि जी.आय. (GI) पाईप्स ड्रेनेजच्या मैला व सांडपाण्याच्या सततच्या संपर्कात आल्यामुळे पूर्णपणे जीर्ण झाले आहेत. परिणामी, ड्रेनेज तुंबल्यास किंवा या जुन्या पाईप्सना गळती लागल्यास ड्रेनेजचे दूषित सांडपाणी थेट पिण्याच्या पाण्यात मिसळण्याची दाट शक्यता असते. यामुळे नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होऊन कॉलरा, टायफाईड यांसारख्या गंभीर जलजन्य आजारांची व जीवघेण्या साथीच्या रोगांची लागण होण्याचा धोका कैक पटीने वाढला आहे.

           शहरातील मुख्य जलवाहिन्या मोठ्या असल्या तरी अंतर्गत आणि छोट्या गल्ल्यांमधील जुन्या वाहिन्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. यापूर्वी महापालिकेच्या वतीने विकास किंवा दुरुस्तीची कामे करताना योग्य तांत्रिक समन्वय आणि नियोजनाचा अभाव राहिल्याने ड्रेनेज आणि पाणी पुरवठ्याच्या लाईन्स एकमेकांत मिसळल्याच्या अनेक घटना यापूर्वीही उघडकीस आल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासनाने केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता कायम स्वरूपी उपाय योजना करावी, अशी आग्रही भूमिका साळेगावकर यांनी मांडली आहे. ड्रेनेज लाईनच्या पोटातून किंवा लगतून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या सर्व जीर्ण पाईपलाईन्स तातडीने बाहेर काढून, त्याठिकाणी पूर्णपणे स्वतंत्र मार्गाने नवीन एचडीपीई पाईपलाईन टाकण्यात यावी, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. एचडीपीई पाईप्स हे अत्यंत टिकाऊ, लवचिक आणि गळती विरोधी असल्यामुळे भविष्यातील दूषित पाण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर टाळण्यास मदत होऊ शकते.

         पुणेकरांच्या आरोग्याची आणि जीवाची निगा राखण्याची मुख्य जबाबदारी महापालिका प्रशासनाची असून, या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन प्रशासनाने शहरात युद्ध पातळीवर पाहणी मोहीम राबवावी, अशी मागणी जोर धरत आहे. ज्या भागांमध्ये ड्रेनेज आणि पाण्याच्या लाईन्स धोकादायक स्थितीत एकत्र आहेत, त्या सर्व ठिकाणांची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना अतिशय स्वच्छ, शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी पुरवठा करण्याची यंत्रणा उभी करावी, अशी मागणी नगरसेवक रवींद्र साळेगावकर यांनी केली आहे. प्रशासना कडून यावर नेमकी काय पावले उचलली जातात आणि पुणेकरांच्या आरोग्याशी चाललेला हा खेळ थांबवण्यासाठी महापालिका किती गांभीर्याने कारवाई करते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! रब्बी पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभरा, मोहरीसह ६ पिकांना वाढीव हमीभाव

Latest News

शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! रब्बी पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभरा, मोहरीसह ६ पिकांना वाढीव हमीभाव शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! रब्बी पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभरा, मोहरीसह ६ पिकांना वाढीव हमीभाव
केंद्र सरकारने २०२७-२८ च्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मोहरी, मसूरसह ६ पिकांच्या हमीभावात (MSP) वाढ जाहीर केली आहे.
महाराष्ट्र बनणार जगाचे ‘इनोव्हेशन हब’; नवी मुंबईत ३०० एकरांवर उभी राहणार इनोव्हेशन सिटी
पिंपरी-चिंचवडच्या लेकीचा आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णवेध; भारतीय महिला तिरंदाजी संघाचा चीनवर विजय
तडीपार आरोपीची पुन्हा गुन्हेगारी; वाहन चोराला पत्नीसह खडक पोलिसांनी पकडले
पुणेकरांनो सावधान! कचरा टाकणे, थुंकणे महागणार; महापालिका दंडाची रक्कम वाढवणार

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software