पुणे पोलिसांकडून पोलीस ठाण्यांची ‘कामगिरी तपासणी’; ACP घेणार प्रलंबित प्रकरणांचा आढावा

पुणे शहरातील पोलीस ठाण्यांच्या कामकाजाची तपासणी करण्यासाठी १ ते १५ ऑक्टोबरदरम्यान ACP प्रत्यक्ष भेटी देऊन प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेणार आहेत.

पुणे : पुणे शहरातील पोलीस ठाण्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आणि प्रलंबित गुन्हे व नागरिकांच्या तक्रारींचा जलद निपटारा करण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष पाहणी मोहीम हाती घेतली आहे. शहरातील सर्व विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्तांना (ACP) आपापल्या विभागातील पोलीस ठाण्यांना प्रत्यक्ष भेट देऊन कामकाजाची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

        या आदेशा नुसार १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सहाय्यक पोलीस आयुक्त नियोजित वेळापत्रकानुसार विविध पोलीस ठाण्यांना भेटी देणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ठाण्यांमधील प्रलंबित गुन्हे, नागरिकांच्या तक्रारी आणि दैनंदिन कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेतला जाणार आहे.

प्रलंबित गुन्ह्यांच्या तपासावर विशेष लक्ष

दीर्घकाळापासून तपास प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेऊन त्यातील अडचणी दूर करण्यासाठी संबंधित तपासी अधिकाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रलंबित प्रकरणांचा तपास वेगाने पूर्ण करण्यावर या पाहणीदरम्यान भर राहणार आहे. नागरिकां कडून पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रार अर्जांवर काय कारवाई करण्यात आली, किती अर्ज प्रलंबित आहेत आणि त्यांचा निपटारा किती वेळेत करण्यात आला, याचीही तपासणी सहाय्यक पोलीस आयुक्तांकडून केली जाणार आहे.याशिवाय पोलीस ठाण्याचे दैनंदिन कामकाज, कायदा व सुव्यवस्थेची स्थिती, सुरक्षाव्यवस्था आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचाही आढावा घेतला जाणार आहे.

शहरातील विविध पोलीस ठाण्यांचा दौऱ्यात समावेश

       या विशेष पाहणी मोहिमेत फरासखाना, विश्रामबाग, स्वारगेट, भारती विद्यापीठ, कोथरूड, सिंहगड रोड, खडकी, येरवडा, वानवडी, लष्कर, हडपसर, लोणी काळभोर, लोणीकंद आणि खराडी यांसह शहरातील विविध विभागांतील पोलीस ठाण्यांना भेटी दिल्या जाणार आहेत. या पाहणीमुळे पोलीस ठाण्यांच्या कामकाजावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे थेट नियंत्रण राहण्यास मदत होणार असून, प्रलंबित गुन्ह्यांचा तपास आणि नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा अधिक वेगाने होण्याची अपेक्षा आहे.

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! रब्बी पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभरा, मोहरीसह ६ पिकांना वाढीव हमीभाव

Latest News

शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! रब्बी पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभरा, मोहरीसह ६ पिकांना वाढीव हमीभाव शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! रब्बी पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभरा, मोहरीसह ६ पिकांना वाढीव हमीभाव
केंद्र सरकारने २०२७-२८ च्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मोहरी, मसूरसह ६ पिकांच्या हमीभावात (MSP) वाढ जाहीर केली आहे.
महाराष्ट्र बनणार जगाचे ‘इनोव्हेशन हब’; नवी मुंबईत ३०० एकरांवर उभी राहणार इनोव्हेशन सिटी
पिंपरी-चिंचवडच्या लेकीचा आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णवेध; भारतीय महिला तिरंदाजी संघाचा चीनवर विजय
तडीपार आरोपीची पुन्हा गुन्हेगारी; वाहन चोराला पत्नीसह खडक पोलिसांनी पकडले
पुणेकरांनो सावधान! कचरा टाकणे, थुंकणे महागणार; महापालिका दंडाची रक्कम वाढवणार

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software