वाघोलीत भीषण अपघात; ट्रॅव्हल्सच्या चाकाखाली आल्याने ५१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

वाघोली, पुणे : वाघोली परिसरात भरधाव वाहनाने अचानक वळण घेतल्याने झालेल्या अपघातात ५१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना ३० सप्टेंबर रोजी सकाळी घडली. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास अहिल्यानगर-पुणे रोडवरील बालाजीनगर बसस्टॉपसमोर, पंजाबी स्पाईस हॉटेलसमोर हा अपघात झाला.
       याप्रकरणी २१ वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून, पोलिसांनी एका अज्ञात इरटीका  वाहनचालकासह इंटरसिटी ट्रॅव्हल्सचा चालक स्वागत अनिल जाधव (वय २६) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, संबंधित वाहनचालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून वाहन हयगयीने, अविचाराने व भरधाव वेगाने चालविले. वाघोलीतील नमूद ठिकाणी वाहनाने अचानक वळण घेतल्याने त्याचा ट्रॅव्हल्सला धक्का लागला. त्याचवेळी फिर्यादीचे वडील रामचंद्र जयवंत भोईटे (वय ५१) हे मोपेड ॲक्टिव्हावरून जात होते.
या अपघातात रामचंद्र भोईटे हे ट्रॅव्हल्सच्या मागील बाजूच्या डाव्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाले. त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 106(1), 281, 125(अ), 125(ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम 184, 132(1), 134 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री थोरात करीत आहेत.

Edited By: Nutan Bhise

खबरें और भी हैं

फुरसुंगीत सुगंधित तंबाखू बनविणाऱ्या कारखान्यावर छापा; 31.91 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक

Latest News

फुरसुंगीत सुगंधित तंबाखू बनविणाऱ्या कारखान्यावर छापा; 31.91 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक फुरसुंगीत सुगंधित तंबाखू बनविणाऱ्या कारखान्यावर छापा; 31.91 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक
पुणे: फुरसुंगी येथील उरुळी देवाची परिसरात बेकायदेशीरपणे सुगंधित तंबाखू तयार करणाऱ्या कारखान्यावर गुन्हे शाखेच्या युनिट-5 आणि अन्न व औषध प्रशासनाच्या...
जिल्हा बँकेसाठी सुनेत्राताई शिंदे यांचा उमेदवारी अर्ज; जावळीला दोन संचालकांच्या घोषणेनंतर राजकीय हालचालींना वेग
जावळी युवा प्रतिष्ठानकडून संतोष कदम सरांचा गुणगौरव
लोहगावमधील पवार वस्तीत ४ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; विश्रांतवाडीनंतर पुण्यात पुन्हा धक्कादायक घटना, नागरिकांमध्ये तीव्र संताप! ​
वाघोलीत भीषण अपघात; ट्रॅव्हल्सच्या चाकाखाली आल्याने ५१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software