जनता अर्बन बँकेला प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावर नेण्याचा निर्धार : राहुल डेरे

सभासद व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पारदर्शक कारभाराचा संकल्प; ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

IMG-20261001-WA0137आनेवाडी : जनता अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., वाईची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी नूतन अध्यक्ष राहुल मधुकर डेरे यांनी सभासद व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने बँकेला अधिक सक्षम करून प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावर नेण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.
         राष्ट्रगीताने सभेची सुरुवात झाली. यावेळी दिवंगत सभासद, राजकीय व्यक्ती तसेच खेळाडूंना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नूतन अध्यक्ष राहुल मधुकर डेरे, उपाध्यक्ष शेखर हणमंत फरांदे तसेच नूतन संचालक मंडळाचे सभासदांच्या वतीने स्वागत व अभिनंदन करण्यात आले.
सभासदांच्या पाल्यांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचा विशेष गुणगौरव करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात राहुल डेरे यांनी बँकेचा नावलौकिक वाढविण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन पारदर्शक पद्धतीने कारभार करण्यावर भर दिला.
        उपाध्यक्ष शेखर फरांदे यांनी सभासदांचे हित केंद्रस्थानी ठेवून स्वच्छ, पारदर्शक आणि विश्वासार्ह कारभार करण्याची ग्वाही दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली बुलुंगे यांनी सभेची नोटीस तसेच विविध विषयांचे वाचन केले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे निवृत्त अधिकारी व बँकेचे सभासद अविनाश जोशी यांनी बँकेने आरबीआयचे आर्थिक मापदंड पाळल्याचे नमूद केले. तसेच बँकेच्या कामकाजातील अडचणी सोडविण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
       सभासद राहुल खरात, मानसिंग कोरडे आणि रुपाली कुदळे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. विजय पोळ, प्रकाश जगताप, सतीश जगताप, अमोल इथापे यांच्यासह सभासदांनी बँकेच्या कामकाजासंदर्भात विविध प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांना अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाने समर्पक उत्तरे दिली. यावेळी संचालक बाळकृष्ण सपकाळ, महेंद्र जमदाडे, निळकंठ मोरे, सुभाष नवले, तानाजी जाधव, तात्याबा धायगुडे, अजय गायकवाड तसेच संचालिका वैशाली चव्हाण आणि रेखा पिसाळ उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या शेवटी संचालिका रेखा पिसाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Edited By: Nutan Bhise

खबरें और भी हैं

फुरसुंगीत सुगंधित तंबाखू बनविणाऱ्या कारखान्यावर छापा; 31.91 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक

Latest News

फुरसुंगीत सुगंधित तंबाखू बनविणाऱ्या कारखान्यावर छापा; 31.91 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक फुरसुंगीत सुगंधित तंबाखू बनविणाऱ्या कारखान्यावर छापा; 31.91 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक
पुणे: फुरसुंगी येथील उरुळी देवाची परिसरात बेकायदेशीरपणे सुगंधित तंबाखू तयार करणाऱ्या कारखान्यावर गुन्हे शाखेच्या युनिट-5 आणि अन्न व औषध प्रशासनाच्या...
जिल्हा बँकेसाठी सुनेत्राताई शिंदे यांचा उमेदवारी अर्ज; जावळीला दोन संचालकांच्या घोषणेनंतर राजकीय हालचालींना वेग
जावळी युवा प्रतिष्ठानकडून संतोष कदम सरांचा गुणगौरव
लोहगावमधील पवार वस्तीत ४ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; विश्रांतवाडीनंतर पुण्यात पुन्हा धक्कादायक घटना, नागरिकांमध्ये तीव्र संताप! ​
वाघोलीत भीषण अपघात; ट्रॅव्हल्सच्या चाकाखाली आल्याने ५१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software