जावळी युवा प्रतिष्ठानकडून संतोष कदम सरांचा गुणगौरव

पुणेस्थ जावळीकरांच्या स्नेहमेळाव्यात शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा सन्मान; ग्रामीण विद्यार्थ्यांना घडविण्याच्या कार्याची दखल

आनेवाडी, ता. जावळी : जावळी युवा प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड, पुणे यांच्या वतीने आयोजित ‘पुणेस्थ जावळीकरांचा स्नेहमेळावा व गुणगौरव सोहळा २०२६’ उत्साहात पार पडला. रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी चिंचवड येथील प्रभू रामचंद्र सभागृहात झालेल्या या सोहळ्यात कला, क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंतांचा गौरव करण्यात आला.
यावेळी जावळी करिअर अकॅडमी, मेढाचे संस्थापक संतोष कदम सर यांचा शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल जावळी युवा प्रतिष्ठानच्या वतीने विशेष गुणगौरव करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न तसेच जावळी तालुक्यात शिक्षणाची चळवळ उभी करण्यातील योगदानाची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला.
     प्रमुख पाहुणे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र केशवराव मोकाशी यांच्या हस्ते संतोष कदम यांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी उद्योजक सुरेश वाडकर, माजी आयुक्त विष्णू धनावडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि पुणेस्थ जावळीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कदम सरांचे अभिनंदन केले.
सत्काराला उत्तर देताना संतोष कदम म्हणाले, “हा सन्मान माझा नसून माझ्या विद्यार्थ्यांचा आणि जावळीच्या मातीचा आहे. ग्रामीण विद्यार्थी घडवणे हेच आमचे ध्येय आहे.”
    जावळी तालुक्यातील पहिली करिअर अकॅडमी म्हणून जावळी करिअर अकॅडमीच्या माध्यमातून सैन्य भरतीसह एमपीएससी, सरळ सेवा, बँकिंग, तलाठी व महसूल विभाग आदी क्षेत्रांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. संस्थेच्या माहितीनुसार, आतापर्यंत ५०० हून अधिक विद्यार्थी विविध सेवांमध्ये नियुक्त झाले असून विद्यार्थी दत्तक योजनेच्या माध्यमातून २० हून अधिक विद्यार्थी सरकारी सेवेत कार्यरत आहेत.
    जावळी युवा प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या स्नेहमेळाव्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येतो. यावेळी नगरसेवक, नगरसेविका आणि इतर सत्कारमूर्ती उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल जुनघरे यांनी केले, तर प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर धनावडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Edited By: Nutan Bhise

खबरें और भी हैं

फुरसुंगीत सुगंधित तंबाखू बनविणाऱ्या कारखान्यावर छापा; 31.91 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक

Latest News

फुरसुंगीत सुगंधित तंबाखू बनविणाऱ्या कारखान्यावर छापा; 31.91 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक फुरसुंगीत सुगंधित तंबाखू बनविणाऱ्या कारखान्यावर छापा; 31.91 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक
पुणे: फुरसुंगी येथील उरुळी देवाची परिसरात बेकायदेशीरपणे सुगंधित तंबाखू तयार करणाऱ्या कारखान्यावर गुन्हे शाखेच्या युनिट-5 आणि अन्न व औषध प्रशासनाच्या...
जिल्हा बँकेसाठी सुनेत्राताई शिंदे यांचा उमेदवारी अर्ज; जावळीला दोन संचालकांच्या घोषणेनंतर राजकीय हालचालींना वेग
जावळी युवा प्रतिष्ठानकडून संतोष कदम सरांचा गुणगौरव
लोहगावमधील पवार वस्तीत ४ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; विश्रांतवाडीनंतर पुण्यात पुन्हा धक्कादायक घटना, नागरिकांमध्ये तीव्र संताप! ​
वाघोलीत भीषण अपघात; ट्रॅव्हल्सच्या चाकाखाली आल्याने ५१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software