लोहगावमध्ये बंद घराचे कुलूप तोडून ३.४० लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

लोहगाव, पुणे : लोहगाव परिसरातील खंडोबा माळ येथील एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा सुमारे ३ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी लोहगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे घर २७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत बंद होते. या कालावधीत अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप काहीतरी साधनाच्या साहाय्याने तोडले. त्यानंतर घरात प्रवेश करून बेडरूममधील कपाटाची झडती घेतली.

कपाटातून ७० हजार रुपये रोख तसेच अंदाजे २ लाख ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण सुमारे ३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला. घर बंद असल्याची संधी साधून ही चोरी करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोहगाव पोलिसांनी तपास सुरू केला असून अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे करीत आहेत.

 

 

 

 

Edited By: Nutan Bhise

खबरें और भी हैं

लोहगावमध्ये बंद घराचे कुलूप तोडून ३.४० लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

Latest News

लोहगावमध्ये बंद घराचे कुलूप तोडून ३.४० लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल लोहगावमध्ये बंद घराचे कुलूप तोडून ३.४० लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल
लोहगाव, पुणे : लोहगाव परिसरातील खंडोबा माळ येथील एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत रोख रक्कम...
खातं उघडून द्या, कमिशन घ्या अन् कोट्यवधींची सायबर फसवणूक! वानवडी पोलिसांनी टोळी पकडली; १९ जणांना १.८० कोटींचा गंडा
भुईंज पोलिसांची मोठी कारवाई; डीपीमधील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
फुरसुंगीत सुगंधित तंबाखू बनविणाऱ्या कारखान्यावर छापा; 31.91 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक
जिल्हा बँकेसाठी सुनेत्राताई शिंदे यांचा उमेदवारी अर्ज; जावळीला दोन संचालकांच्या घोषणेनंतर राजकीय हालचालींना वेग

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software