भुईंज पोलिसांची मोठी कारवाई; डीपीमधील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

तीन आरोपींचा सहभाग उघड; तब्बल २०० किलो तांब्याच्या तारा जप्त


आनेवाडी: भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ट्रान्सफॉर्मरमधील (डीपी) तांब्याच्या तारा चोरी करणाऱ्या टोळीचा भुईंज पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल २०० किलो तांब्याच्या तारा जप्त केल्या असून, या चोरीच्या घटनांमध्ये तीन आरोपींचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. सलग घडलेल्या डीपी चोरीच्या तीन घटनांचा छडा लागल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
      पाचवड (ता. वाई) गावच्या हद्दीत बबन गायकवाड यांच्या गट क्रमांक ३८० मधील ६३ केव्हीए क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरमधून दि. ३ जुलै रोजी रात्री १० ते दि. ४ जुलै रोजी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान सुमारे ७० किलो तांब्याची तार चोरीस गेली होती. याप्रकरणी लाईनमन वैभव रोहिदास भोसले यांच्या तक्रारीवरून भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२२/२०२६ अन्वये बीएनएस कलम ३०३(२), ३२४(४) तसेच भारतीय विद्युत अधिनियम कलम १३६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यानंतर केंजळ (ता. वाई) येथील माळ परिसरातील ११० केव्हीए क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरमधून सुमारे ५५ किलो तांब्याची तार चोरीला गेल्याचे समोर आले. तसेच दि. ७ जुलैच्या रात्रीपासून ८ जुलैच्या सकाळपर्यंत खोलवडी (ता. वाई) गावच्या हद्दीत धोम कॅनॉललगत असलेल्या ११० केव्हीए ट्रान्सफॉर्मरमधूनही सुमारे ५५ किलो तांब्याची तार चोरीस गेली होती.
      या सलग चोरीच्या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी भुईंज पोलिसांना गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.
दरम्यान, भुईंज पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अन्य एका गुन्ह्यात मुक्या उर्फ अमोल विनोद भोसले हा अटकेत होता. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने पाचवड, केंजळ आणि खोलवडी येथील डीपीमधील तांब्याच्या तारा चोरी केल्याची माहिती दिली. या चोरीमध्ये विनोद भोसले आणि चकदे भोसले यांचाही सहभाग असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
       आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी पुढील कारवाई करत चोरीस गेलेल्या सुमारे २०० किलो तांब्याच्या तारा जप्त केल्या. या कारवाईमुळे परिसरातील डीपी चोरीच्या सलग घटनांचा उलगडा झाला आहे. प्रकरणाचा पुढील तपास भुईंज पोलीस करीत आहेत.
पोलिसांच्या पथकाची कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत भुईंज पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पूनम झगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस उपनिरीक्षक सूरज शिंदे, आकाश मोरे, पोलीस हवालदार नितीन जाधव, अमोल सपकाळ, आप्पा कोलवडकर, पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ बल्लाळ आणि सागर मोहिते यांनी सहभाग घेतला.

Edited By: Nutan Bhise

खबरें और भी हैं

खातं उघडून द्या, कमिशन घ्या अन् कोट्यवधींची सायबर फसवणूक! वानवडी पोलिसांनी टोळी पकडली; १९ जणांना १.८० कोटींचा गंडा

Latest News

खातं उघडून द्या, कमिशन घ्या अन् कोट्यवधींची सायबर फसवणूक! वानवडी पोलिसांनी टोळी पकडली; १९ जणांना १.८० कोटींचा गंडा खातं उघडून द्या, कमिशन घ्या अन् कोट्यवधींची सायबर फसवणूक! वानवडी पोलिसांनी टोळी पकडली; १९ जणांना १.८० कोटींचा गंडा
पुणे : बनावट बँक खाती उघडून त्यांचा वापर सायबर फसवणुकीतील रक्कम वळवण्यासाठी करणाऱ्या टोळीचा वानवडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. आरोपींनी...
भुईंज पोलिसांची मोठी कारवाई; डीपीमधील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
फुरसुंगीत सुगंधित तंबाखू बनविणाऱ्या कारखान्यावर छापा; 31.91 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक
जिल्हा बँकेसाठी सुनेत्राताई शिंदे यांचा उमेदवारी अर्ज; जावळीला दोन संचालकांच्या घोषणेनंतर राजकीय हालचालींना वेग
जावळी युवा प्रतिष्ठानकडून संतोष कदम सरांचा गुणगौरव

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software